नाशिक : जेसीबी चाेरट्यास परराज्यातून अटक, पिंपळगाव पोलिसांची कारवाई | पुढारी

नाशिक : जेसीबी चाेरट्यास परराज्यातून अटक, पिंपळगाव पोलिसांची कारवाई

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

जेसीबी घेऊन निघालेल्या ट्रेलरला अडवून दमदाटी करीत दोन जेसीबी चाेरी करणाऱ्या संशयितास पिंपळगाव बसवंत पोलिसांनी परराज्यातून अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाबदपू (जि. वाराणसी, उत्तर प्रदेश) येथून दोन नवीन जेसीबी घेऊन मुंबई येथे निघालेला ट्रेलर पिंपळगाव टोल नाका परिसरात उभा असताना संशयिताने सोमवारी (दि.१२) रात्री नऊच्या सुमारास जबरदस्तीने अडवून चालकास लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत वाहनासह पसार झाला होता. याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दिल्ली येथून दोन जेसीबीसह संशयितास अटक केली आहे.

हितेशकुमार सचदेवा (रा. नोएडा, दिल्ली) असे संशयिताचे नाव आहे. त्यांच्याकडून ६८ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दिलीप राम कैलाश कुमार पटेल (२७) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, संशयितांनी गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी युपी-दिल्ली हरियाणाकडे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोकराव पवार यांनी पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक पावशे, पोलिस कर्मचारी युवराज खांडवी, अमोल आहेर, संतोष ब्राह्मणे यांचे पथक दिल्लीच्या दिशेने रवाना केले होते. या पथकाने दिल्ली येथून संशयितास अटक केली. त्याने जेसीबी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button