नाशिक: देवळाली व्यापारी बँक निवडणूक: अर्ज छाननीवेळी सत्ताधारी- विरोधकांमध्ये बाचाबाची | पुढारी

नाशिक: देवळाली व्यापारी बँक निवडणूक: अर्ज छाननीवेळी सत्ताधारी- विरोधकांमध्ये बाचाबाची

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा : नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जाची आज (दि.१७) छाननी झाली. यादरम्यान सहायक निवडणूक अधिकारी यांच्यासमोरच सत्ताधारी आणि विरोधी पॅनलमध्ये शिवीगाळ, शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. तसेच कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना किरकोळ धक्काबुकी देखील झाली. दरम्यान, या प्रकारामुळे बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात व्यापारी बँकेच्या निवडणूक अर्जाची छाननी प्रक्रियेला सकाळी सुरुवात झाली. त्यावेळी सहायक निवडणूक अधिकारी यांच्यासमोर अविनाश विठ्ठल अरींगळे यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी सुरू होती. यादरम्यान नाशिकरोड व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्ती अरींगळे आणि ज्येष्ठ संचालक अशोक सातभाई यांच्यात अर्जावरून एकमेकांमध्ये शिवीगाळ अन् शब्दिक बाचाबाची झाली. एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार देखील घडला. सत्ताधारी आणि विरोधी पॅनलच्या नेते, कार्यकर्त्यांनी समजूत काढून अरींगळे सातभाई यांना शांत केले. दरम्यान पुन्हा दोन्हीही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, शिवीगाळ झाल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा 

Back to top button