AMPC Election 2023 : सिन्नर, देवळा बाजार समितीसाठी आतापर्यंत इतके ‘टक्के’ मतदान | पुढारी

AMPC Election 2023 : सिन्नर, देवळा बाजार समितीसाठी आतापर्यंत इतके 'टक्के' मतदान

नाशिक : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठी शुक्रवारी (दि. 28) मतदान होत आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव आणि येवला या बाजार समित्यांचे निकाल जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.

सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मतदान होत असलेल्या बाजार समित्यांमध्ये नाशिक बाजार समितीसह  सुरगाणा, देवळा, घोटी, पिंपळगाव बसवंत, कळवण, येवला, नांदगाव, सिन्नर, दिंडोरी, चांदवड, मालेगाव आणि लासलगाव यांचा समावेश आहे. फक्त मनमाडला ३० एप्रिलला मतदान होणार आहे.

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती

माजी आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सिन्नर बाजार समितीसाठी दुपारी 2 वाजेपर्यंत 73.89 टक्के मतदान झाले आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत 22.4 टक्के तर , दुपारी 12 वाजेपर्यंत 53. 94 टक्के मतदान झाले होते.

देवळा बाजार समिती निवडणूक 

दुपारी ३ .३० वाजेपर्यंत गटनिहाय झालेले मतदान

सोसायटी गट -४९६ / ५१०
व्यापारी गट -४२१ / ४३७
हमाल / तोलारी _ ९४/ ९६

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती

दुपारी २ वाजेपर्यंत येवल्यात 68 टक्के मतदान झाले आहे.

1) सोसायटी मतदार संघ : १०४८ पैकी ७८९
2) ग्रामपंचायत मतदार संघ : ८३४ पैकी ५२१
3) व्यापारी व आडते मतदार संघ : ४२३ पैकी २५१
4) हमाल व तोलारी मतदारसंघ : ३५३ पैकी २४५
एकूण झालेले मतदान : २६५८ पैकी १८०६

मालेगाव बाजार समिती निवडणूक

दुपारपर्यंत ५० टक्के मतदान


मालेगाव : शहरातील काबरा विद्यालय केंद्रात मतदारांच्या लागलेल्या रांगा.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत काबरा केंद्रात सरासरीच्या ५० टक्केपर्यंत मतदान पोहोचले होते. याचप्रमाणे झोडगे, सौंदाणे आणि निमगाव केंद्रावर उत्साह पहायला मिळाला.

एकूण १८ जागांसाठी ही लढत होत आहे. ३९७० मतदार असून अधिकाधिक मत नोंदवून घेण्यासाठी तिन्ही पॅनल प्रयत्न करत आहेत. दुपारुन मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बारा वाजेपर्यंत ४३ टक्के एकूण मतदान झाले होते. हीच सरासरी कायम राहिल्यास ९० टक्क्यांहून अधिक मत नोद होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मालेगाव कृउबासाठी यंदा तिरंगी लढत होत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनल, ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल आणि शेतकरी संघटनांचे बाजार समिती बचाव पॅनल नशीब आजमावत आहे.

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती

दुपारी 02 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान
1) सोसायटी मतदार संघ :- 622
2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 966
3) व्यापारी मतदार संघ :-349
4) हमाल तोलारी मतदारसंघ :-47
एकूण झालेले मतदान :-1984
झालेल्या मतदानाची टक्केवारी 85.15

दुपारी 03 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान
1) सोसायटी मतदार संघ :- 681
2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 1072
3) व्यापारी मतदार संघ :-392
4) हमाल तोलारी मतदारसंघ :- 48
एकूण झालेले मतदान : 2193
झालेल्या मतदानाची टक्केवारी
94.12

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

दुपारी दोन वाजे पर्यंत झालेले मतदान. 87.99 टक्के 

●सोसायटी 575
●ग्रामपंचायत. 507
●व्यापारी 275
●हमाल मापारी 109

दोन वाजेनंतर आतापर्यंत 94.5 टक्के मतदान झाले आहे.
●सोसायटी 598
●ग्रामपंचायत. 547
●व्यापारी 312
●हमाल मपारी 110

देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती

दुपारी १.३० वाजेपर्यंत गटनिहाय झालेले मतदान

/ एकूण मतदान –

सोसायटी गट -४०० / ५१०
व्यापारी गट -३५० / ४३७
हमाल / तोलारी _ ९० / ९६

लासलगाव बाजार समिती निवडणूक 

लासलगाव बाजार समिती निवणुकीसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत ३३.२८ टक्के मतदान झाले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत एकूण २२९३ मतदारांपैकी ७६३ मतदारांनी मतदान केले असून, ३३.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी शरद घोरपडे यांनी दिली

जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र, जिल्हा परिषद समूह साधन केंद्र लासलगाव या ठिकाणी मतदान घेतले जात आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी शरद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता मतदान घेण्यास सुरुवात करण्यात आली.

यावेळी शेतकरी विकास पॅनल तसेच शेतकरी पॅनल व अपक्ष उमेदवारांनी मतदान केंद्राच्या आवारात मोठी गर्दी केली आहे. यावेळी मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना उमेदवार हात जोडून विनती करताना दिसत होते. या वेळी लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती

चांदवड कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत ७९ टक्के मतदान

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत एकूण २ हजार २७६ मतदारांपैकी १७९८ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केल्याने ७९ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येथील भन्साळी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मतदान घेतले जात आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 वाजता मतदान घेण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विकास पॅनल व राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना गट यांच्या महाविकास आघाडीच्या लोकमान्य परिवर्तन पॅनल तसेच अपक्ष उमेदवारांनी मतदान केंद्राच्या आवारात मोठी गर्दी केली आहे. यावेळी मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना उमेदवार हात जोडून विंनती करताना दिसत होते.

देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती

कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील मराठी शाळेत सहकारी संस्थेच्या शेतकरी गटात मतदार केंद्रांवर मतदान करण्यासाठी सकाळी १०:३० वाजता लागलेली रांग

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत दुपारी बारा वाजेपर्यंत हमाल मापारी गटात 17 टक्के तर सोसायटी गटात 31 टक्के मतदान झाले आहे.

सोसायटी बूथ क्र.1 वर 64 मते
सोसायटी बूथ क्र.2 वर 95 मते
सोसायटी बूथ क्र.3 वर 94 मते
सोसायटी गट एकूण = 253

ग्रामपंचायत गट बूथ क्र.1 वर 63 मते
ग्रामपंचायत गट बूथ क्र.2 वर 77 मते
ग्रामपंचायत गट एकूण = 140
हमाल/ मापरी गट – 62
व्यापारी गट -121

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती

दिंडोरी- सकाळी 10 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान
1) सोसायटी मतदार संघ :- 153
2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 123
3) व्यापारी मतदार संघ :-112
4) हमाल तोलारी मतदारसंघ :-29
एकूण झालेले मतदान :-417
झालेल्या मतदानाची टक्केवारी 17.89

दिंडोरी- दुपारी 12 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान
1) सोसायटी मतदार संघ :- 427
2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 529
3) व्यापारी मतदार संघ :-253
4) हमाल तोलारी मतदारसंघ :-43
एकूण झालेले मतदान :-1252
झालेल्या मतदानाची टक्केवारी 53.73

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती 

नाशिक बाजार समितीमध्ये माजी खासदार देवीदास पिंगळे आणि चुंभळे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, मनमाड, लासलगाव आणि येवला या पाच बाजार समित्यांचे निकाल जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.

कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

कळवणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार व माजी आमदार जे. पी. गावित या दोघांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत होत आहे.

सकाळी 8 ते 10 पर्यंत सोसायटी गट -129 / – ग्रामपंचायत गट – 89/ व्यापारी गट – 81 / हमाल मापारी – 32 मतदान झाले आहे.

Back to top button