Nashik : आज ईद-उल-फित्र; ईदगाहमध्ये सामूहिक नमाज पठण | पुढारी

Nashik : आज ईद-उल-फित्र; ईदगाहमध्ये सामूहिक नमाज पठण

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शनिवारी (दि. २२) ईद-उल-फित्र साजरी होत आहे. यानिमित्ताने नाशिकमधील ईदचा मुख्य सोहळा ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठणाद्वारे पार पडणार आहे. खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दिन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 ला होणाऱ्या नमाज पठणासाठी मुस्लीम बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शुक्रवारी (दि. २१) संध्याकाळी रमजानचा २९ वा रोजा सोडताच चंद्रदर्शन घडल्याने मध्यवर्ती शाही मशीद चांद कमिटीतर्फे शनिवारी ईद असल्याची घोषणा होताच बाजारामध्ये गर्दी उसळली होती. ईदच्या नमाजावेळी लागणारी वस्तू जसे अत्तर, टोपी, सुरमा या दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र होते. चंद्रदर्शन होताच म्हशीच्या दुधाच्या मागणीत भरमसाट वाढ झाल्याने किंमत वाढली व बाजारात दुधाची कमतरता निर्माण झाली होती.

हेही वाचा : 

Back to top button