नाशिक : होळकर पुलावरून एकाची गोदावरीत उडी | पुढारी

नाशिक : होळकर पुलावरून एकाची गोदावरीत उडी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

गोदावरी नदीवरील होळकर पुलावरून एका अज्ञात व्यक्तीने सकाळच्या सुमारास नदीत उडी मारल्याची घटना शुक्रवारी (दि.७) घडल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत निश्चित माहिती मिळत नसली तरीदेखील पंचवटी विभागीय कार्यालयातील अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक जीवरक्षक यांनी होळकर पुलाच्या पश्चिम दिशेला दिवसभर शोध घेतला. परंतु मृतदेह हाती लागला नाही. यावेळी नागरिकांनी पुलावर मोठी गर्दी केली होती.

सध्या गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नागरिकांनी फोनवरून माहिती कळवली असली तरी प्रत्यक्षदर्शी व्यक्ती नसल्याने सदर व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे समजू शकले नाही. यामुळे पंचवटी पोलिसांकडून देखील या घटनेस दुजोरा मिळू शकला नाही. मात्र शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू होईल, असे अग्निशामक दलाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button