नाशिक : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक | पुढारी

नाशिक : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

११ महिन्यात गुंतवणूकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमीष दाखवून दोघांनी मिळून एकास २० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रदीप नामदेव मंडळ (४५, रा. श्रमिक नगर, सातपूर) यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अविनाश विनोद सुर्यवंशी (रा. लासलगाव, ता. निफाड) व ईशा जैस्वाल यांच्याविरोधात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.

प्रदीप यांच्या फिर्यादीनुसार, दोघा संशयितांनी त्यांना मार्च २०२२ ते २७ मार्च २०२३ या कालावधीत बोधले नगर परिसरात गंडा घातला. दोघा संशयितांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने कंपनी स्थापन करून शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रदीप यांना प्रोत्साहित केले. गुंतवणूक केल्यास गुंतवणूकीच्या रकमेवर ११ महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचे आमीष दोघांनी प्रदीप यांना दाखवले. त्यानुसार प्रदीप यांनी त्यांच्यासह नातलगांचे २० लाख रुपये संशयितांना दिले. मात्र ठरल्याप्रमाणे दोघा संशयितांनी त्या पैशांचा अपहार केला तसेच दुप्पट परतावा दिला नाही किंवा गुंतवलेले पैसेही परत केले नाही. त्यामुळे प्रदीप यांनी मुंबईनाका पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

Back to top button