पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त | पुढारी

पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त

पैठण पुढारी वृत्तसेवा (चंद्रकांत अंबिलवादे) : पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर संचालक मंडळाची निवडणूक पार पडेपर्यंत दि.२८ पासून छत्रपती संभाजी नगर येथील प्रादेशिक साखर संचालक यांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे संत एकनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीला वेग आला आहे. सहा महिन्याच्या कालावधीसाठी व नवीन संचालक मंडळाच्या निवडणूक होईपर्यंत कारखान्याचे कामकाज पाहण्यासाठी दि.२८ मार्च पासून एकनाथ कारखान्यावर जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते व फुलंब्री येथील सहाय्यक निबंधक व्ही.पी रोडगे यांची प्रशासक पदावर नियुक्ती करण्याचा आदेश छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक साखर सहसंचालक शरद जरे यांनी दिला आहे. दरम्यान संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद भारतीय जनता पार्टीचे तुषार सिसोदे यांच्या ताब्यात असून कारखाना एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आला होता.

संचालकांच्या कार्यकाळात विद्यमान चेअरमन तुषार सिसोदे यांच्या कामकाजाची चौकशी माजी चेअरमन आप्पासाहेब पाटील यांच्यासह अनेक संचालक मंडळांनी केली आहे. कारखान्यामध्ये स्लीप बॉय म्हणून काम पासून चेअरमन ते आमदार झालेले राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री व संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या समर्थकांसह जिल्हा परिषद माजी सभापती विलास बापू भुमरे यांनी एकनाथ कारखाना ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली आहे.

Back to top button