[author title="चिराग दारूवाला " image="http://"][/author]
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहांची अनुकूलता आणि सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला लक्षणीय यश मिळवून देईल. या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. भविष्यातील महत्त्वाच्या योजनाही आखल्या जातील. मालमत्ता किंवा वारसाशी संबंधित काही कामांमधील चुका टाळा. भावांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. मुलाच्या समस्या सोडविण्यास तुमची साथ महत्त्वपूर्ण ठरेल. तुमची कार्यशैली आणि योजना तुमच्या व्यवसायाला चालना देऊ शकतात.
आज सामाजिक आणि राजकीय कार्यात तुमची आवड वाढेल. राजकीय संपर्कही तुम्हाला काही चांगल्या संधी उपलब्ध होतील. नवीन वाहन खरेदीबाबत नियोजन कराल. उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक समस्या सुटू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे, अशी सूचना श्रीगणेश करतात. मित्रांसोबत निष्कारण मनोरंजना वेळ घालवल्यास तुमचे महत्त्वाचे काम रखडले जावू शकते. पती-पत्नीचे नाते मधूर राहिल.
आज दैनंदिन जीवनापेक्षा वेगळा दिवस व्यतीत कराल. त्यामुळे तुमचा मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होईल. एक नवीन ऊर्जा प्रवाहाचा अनुभव घ्याल. तुमच्या भावनिकतेचा चुकीचा फायदा घेण्याची शक्यता. एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी सर्व स्तरांचा काळजीपूर्वक विचार करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. मित्रांसोबत जास्त वेळ घालवणे नुकसानकारक ठरु शकते. भागीदारीशी संबंधित व्यवसायात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. पती-पत्नीमध्ये योग्य सलोखा राखला जाईल. आरोग्य चांगले राहू शकते.
श्रीगणेश सांगतात की, आज काही महत्त्वाच्या व्यक्तींसोबत वेळ जाईल. हा नवीन यश मिळविण्याचा मार्ग देखील बनेल. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी योजनांचा पुनर्विचार करा. एखादी छोटीशी चूकही तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. तुम्ही तुमच्या व्यवसायात केलेली बदलाची धोरणे लवकरात लवकर लागू करा. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या समस्या सोडवता येतील.
आज तुम्ही व्यवसायात अधिक व्यस्त राहल. घरातील नूतनीकरण करणार असाल तर वास्तू नियमांचे पालन करणे अधिक योग्य ठरेल. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी बजेट राखणे आवश्यक आहे, अशी सूचना श्रीगणेश करतात. मौल्यवान वस्तू हरवल्याने किंवा विसरल्याने कुटुंबात तणाव निर्माण होईल. मात्र प्रयत्न केल्यास हरवलेली वस्तू परत मिळू शकते. मालमत्तेच्या प्रश्नावरुन नातेवाईक किंवा भावाशी वाद होऊ शकतो.
मालमत्ते संबंधित एखादे न्यायालयीन प्रकरण किंवा प्रलंबित कामावर तोडगा निघाल्याने मानसिक तणावातून आराम मिळू शकतो, असे श्रीगणेश सांगतात. आज कोणतीही कृती करताना सावधगिरी बाळगा, छोट्या चुकांमुळे मोठे नुकसान होऊ शकते. आपल्या योजना उघड करू नका; कोणीतरी त्याचा फायदा घेऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रातील कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरण आनंददायी असू शकते. खाण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोटविकारची त्रास होण्याची शक्यता.
श्रीगणेश म्हणतात, आज कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्या. तुम्हाला नक्कीच सकारात्मक विचाराची क्षमता मिळेल. कुटुंबातील मागण्यांची पूर्तता करण्यासाठी नियोजन कराल. तुमच्या निष्काळजीपणामुळे जवळच्या नातेवाईकाशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घरातील मोठ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. यंत्र आणि लोखंडाशी संबंधित व्यवसायात यश मिळू शकते. पती-पत्नीच्या नात्यात योग्य सौहार्द राहील.
गणेश म्हणतात की, धार्मिक संस्थांशी संबंधित सेवा-कार्यात रस घेतल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. समाजात प्रतिष्ठा लाभेल. ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा, यशही मिळू शकते. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर सध्या तो टाळा. आर्थिक बाबी सध्या सामान्य राहतील. अनावश्यक खर्चात कपात करा. व्यवसायात आज जास्त मेहनत करावी लागेल. एकाच वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. पती-पत्नीच्या सहकार्याने एकमेकांचा आत्मविश्वास कायम राहील. ॲलर्जीशी संबंधित त्रास होण्याची शक्यता.
शारीरिक आणि मानसिक आराम मिळण्यासाठी काहीवेळ धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात व्यतीत होईल, असे श्रीगणेश सांगतात. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा गांभीर्याने विचार करा. कोणत्याही प्रकारच्या कागद पत्रांवर स्वाक्षरी करताना सावधगिरी बाळगा. छोट्याशा चुकीचे मोठे परिणाम होऊ शकतात. अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते.
श्रीगणेश सांगतात की, आज गरजू मित्राला मदत कराल. मुलांना अभ्यासातील त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर पुन्हा विचार करा. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या मौल्यवान वस्तूंची चांगली काळजी घ्या. व्यापार क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये काही व्यत्यय येऊ शकतो. जीवनसाथी आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढेल.
ग्रहांची स्थिती पूर्णपणे अनुकूल आहे, तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास कायम राहिल. समाजातील तुमची प्रतिष्ठा वाढेल. यश अबाधित ठेवण्यासाठी स्वभावात सौम्यता राखणे महत्वाचे आहे. आर्थिक चिंता राहील;पण ही समस्या काही काळ राहणार असल्याने काळजी करण्याची गरज नाही. घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर सुरुवात करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे श्रीगणेश सांगतात.
श्रीगणेश सांगतात की, आज दैनंदिन व्यवहारात काही बदल करण्यासाठी तुमच्या आवडीच्या कामांमध्ये वेळ घालवा. कौटुंबिक वातावरणातही सकारात्मक बदल घडू शकतात. मुलाखतीमधील अपयशामुळे तरुण निराश होतील. व्यवसायाशी संबंधित कोणत्याही कामात सर्व बाबींचा विचार करुनच निर्णय घ्या. पती-पत्नीच्या नात्यात मतभेद होऊ शकतात.