मालेगाव : दहिदीला महिलेचा निर्घृण खून | पुढारी

मालेगाव : दहिदीला महिलेचा निर्घृण खून

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा :  मालेगाव तालुक्यातील दहिदी गावात थरकाप उडविणारी घटना घडली आहे. शेतात काम करणार्‍या महिलेचा हात पाय तोडून निर्घृणपणे खून झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. सुमन भास्कर बिचकुले असे मयत महिलेचे नाव आहे. त्या कांद्याच्या शेतात काम करित असताना तिच्यावर अज्ञाताने प्राणघातक हल्ला चढविला.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तपास सुरु केला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मंगळवारी (दि ३१) सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा;

Back to top button