Shanti Bhushan Passed Away : माजी कायदा मंत्री तथा ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन | पुढारी

Shanti Bhushan Passed Away : माजी कायदा मंत्री तथा ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे मंगळवारी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शांती भूषण यांनीच अलाहाबाद उच्च न्यायालयात राजनारायण यांची बाजू मांडली होती. या प्रकरणातच इंदिरा गांधींना 1974 मध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी मोरारजी देसाई मंत्रालयात 1977 ते 1979 पर्यंत भारताचे कायदा मंत्री म्हणून काम केले. (Shanti Bhushan Passed Away)

माजी कायदा मंत्री शांती भूषण यांनी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात ‘मास्टर ऑफ रोस्टर’ प्रणालीत बदल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती. रोस्टर अंतर्गत खटले खंडपीठाकडे पाठवण्याचे तत्त्व आणि कार्यपद्धती ठरवावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. शांती भूषण यांनी त्यांचा मुलगा आणि वकील प्रशांत भूषण यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. (Shanti Bhushan Passed Away)

शांती भूषण हे काँग्रेस (ओ) आणि नंतर जनता पक्षाचे सदस्य होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते राज्यसभेचे खासदारही होते. 1980 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 1986 मध्ये भाजपचा राजीनामा दिला. 2012 मध्ये त्यांचा मुलगा प्रशांत भूषण यांच्यासह ते आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. नंतर त्यांनी आम आदमी पक्षापासून फारकत घेतली.


अधिक वाचा :

Back to top button