नाशिकमध्ये गोदावरी पात्र स्वच्छता मोहीम सुरू | पुढारी

नाशिकमध्ये गोदावरी पात्र स्वच्छता मोहीम सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गोदापात्राची स्वच्छता मोहीम सोमवार (दि. ३०) पासून सुरू झाली. पंचवटीमधील रामकुंड ते संत गाडगेबाबा पुलादरम्यानच्या पात्रातील गाळ काढला जाणार आहे.

शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदापात्राच्या साफसफाईची मोहीम आठ दिवस चालणार आहे. जेसीबी, ट्रॅक्टर आणि कामगारांचा सहभाग असलेल्या या मोहिमेचा कालावधी आवश्यकतेनुसार वाढविला जाऊ शकतो, अशी माहिती पंचवटी विभागीय कार्यालयातील बांधकाम विभागातील उपअभियंता प्रकाश निकम यांनी दिली.

देशभरातून पंचवटीत गोदाकाठी येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये. पाण्याला वास येऊ नये म्हणून नदीपात्र खोल करून पाणी प्रवाहित करणे, हा स्वच्छता मोहिमेचा उद्देश आहे. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे विविध माध्यमांतून जनजागृती सुरू आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचेही सहकार्य लाभत आहे. शहरातील शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी गोदागीतही म्हटले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button