नाशिक : तीन वर्षांनंतरही पुलाला लागेना मुहूर्त | पुढारी

नाशिक : तीन वर्षांनंतरही पुलाला लागेना मुहूर्त

नाशिक (मुल्हेर) : पुढारी वृत्तसेवा
मुल्हेरपासून दोन किलोमीटर अंतरावर बाबेश्वर शिवारात मोसम नदीवरील सोनलवान नाल्यावर तीन वर्षांपूर्वी फरशीपूल मंजूर झाला होता. त्याचे काम अद्यापही सुरू न झाल्याने शेतकरीवर्गाचे व नागरिकांचे हाल सुरू आहेत. 2018 मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या निधीतून मुल्हेर ते बाबेश्वर रस्ता व फरशी पुलासाठी 55 लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र पुलाचे काम अद्याप सुरूदेखील झालेले नाही. फरशीपूल नसल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोसम नदीला या ठिकाणी नेहमी पाणी असते, त्यामुळे शेतीमाल वाहतूक करणे जिकिरीचे होऊन जाते. तसेच प्रसिद्ध बाबेश्वर शिवमंदिरात येणार्‍या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतोे. त्यामुळे प्रशासनाने हे काम सुरू करावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे, बन्सीलाल बत्तीसे आदींनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button