पिंपळनेर : जैताणेला १६० किलो तांब्याच्या तारेसह प्लेटचा साठा हस्तगत | पुढारी

पिंपळनेर : जैताणेला १६० किलो तांब्याच्या तारेसह प्लेटचा साठा हस्तगत

पिंपळनेर,(ता.साक्री)  :  पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील जैताणे येथील इसमाच्या घरी तांब्याची तार व प्लेटचा साठा आढळल्याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

निजामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल वसंत गरदरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी (दि.१७) रात्री १ च्या सुमारास पंकज नानाभाऊ अभंगे (३५, रा. संजयनगर) यांच्या घरी छापा टाकला असता एक लाख ९२ हजार रुपये किमतीची १६० किलो तांब्याची तार व तांब्याच्या प्लेटचा साठा आढळून आला. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात संशयित अभंगे यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button