ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव | पुढारी

ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला मतदान होत आहे. मतदानासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. तसेच मतदानासाठी ईव्हीएम आणि आवश्यक साहित्य वेळेत तालुक्यांना पोहोचविण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या चार तालुक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम भरात आला आहे. माघारीनंतर काही ग्रामपंचायतींनी बिनविरोधची परंपरा कायम राखली. तर काही ठिकाणी थेट सरपंच व सदस्य हे बिनविराेध ठरले. उर्वरित ठिकाणी रविवारी (दि.१६) मतदान घेण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ तारखेला मतमाेजणी होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी केंद्र अंतिम करणे, मतदानासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देणे तसेच आवश्यक ईव्हीएमसाठीची जुळवाजुळव केली जातेय. गेल्या महिन्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींमध्ये किरकोळ अपवाद सोडता निवडणुका शांततेत झाल्या होत्या.

हेही वाचा:

Back to top button