नाशिक : सहा हजार रुपयांसाठी चिमुकलीला राबविले पाच वर्ष | पुढारी

नाशिक : सहा हजार रुपयांसाठी चिमुकलीला राबविले पाच वर्ष

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

श्रमजिवी संघटनेने मागच्या महिन्यात बाल वेठबिगारीची काही प्रकरणे उघडकीस आणल्यानंतर धाबे दणाणलेल्या सिन्नर तालुक्यातील पाच वर्ष कष्टाचे काम करून घेत असलेल्या बालीकेस तीच्या घरी आणून सोडल आहे. श्रमजिवी संघटनेच्या मदतीने मुलीच्या आई वडीलांनी ञ्यंबक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ञ्यंबक पोलीस आरोपीला ताब्यात घेण्यासाठी मुलीला सोबत घेऊन मेंढपाळाचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव येथील कातकरी समाजाच्या 11 वर्ष वयाची पिंकी बाळू वाघ या मुलीची सिन्नर तालुक्यातील हिवरगाव पंचाळे येथून मेंढपाळाच्या वेठबिगारीतून सुटका झाली आहे. श्रमजिवी संघटनेच्या दणक्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवार 1 ऑक्टोंबर ञ्यंबक ठाण्यात मुलीची आई रमी बाळु वाघ (रा. शिरसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी रमेश सुर्यभान ढेपले, (रा. हिवरगाव, ता. सिन्नर) याचे विरूध्द वेठबिगार उच्चाटन कायदा आणि बालन्याय हक्क कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सुटका झालेल्या मुलीच्या आईने दिलेली माहिती या प्रमाणे आहे आई, वडील आणि चार भावंडे यांच्यासोबत शिरसगाव येथे राहत असतांना पाच वर्षांपूर्वी पिंकी बाळू वाघ ही मुलगी पहिलीत शिकत होती. तेव्हा तेथे रमेश सुर्यभान ठेपले आला. त्याने या पिंकी या मुलीला मेंढया वळण्याचे काम देतो त्याबदल्यात आईवडीलांना 6000 रूपये रोख दिले व मुलीला सोबत घेऊन गेला. तेथे ती मुलगी दररोज रोज सकाळी केवळ चहा पिवून मेंढ्या बसलेला वाडा झाडायची, नंतर तीला जेवण देत असत. नंतर सकाळी नऊ पासून मेंढया व शेळ्या घेऊन चारण्यासाठी रानात जात असे. सायंकाळपर्यंत जवळपास 100 ते 150 मेंढ्या चारत रानोमाळ फिरावे लागत असे. मुलीला दररोज पोटभर जेवायला देत नसत. भांडी घासणे, मेंढया शेळ्या यांना चारा पाणी करणे, स्वच्छता करणे यासारख्या कामांनी कंटाळलेली पिंकी मला माझ्या घरी नेवून सोडा म्हणून विनवणी करत असे. मात्र, रमेश ढेपले आणि त्याचे कुटुंबीय लक्ष देत नव्हते. दरम्यान, श्रमजीवी संघटनेने बाल वेठबिगारीची या सारखी काही प्रकणे उजेडात आणल्याने रमेश ढेपले याचे धाबे दणाणले आणि साधारण दहा दिवसांपूर्वी रमेश ठेपले याने अचानक मुलगी पिंकी हीस आणून सोडले. घरी आल्यानंतर मुलगी पिंकी हिने तीच्या आईवडीलांना पाच वर्षात ढेपले यांनी तिस दिलेल्या त्रासाबाबत व घडलेल्या प्रकाराबाबत सांगितलेत्यानंतर श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष भगवान डोखे, सुरेश पुंजारे, सुंदराबाई वाघ यांचे मदतीने आई वडिलांनी त्र्यंबक तहसीलदार दीपक गिरासे यांचेकडे येऊन घडलेला प्रकार सांगितला. मुलीने स्व:ता तहसीलदार दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, सहायक निरीक्षक अश्विनी टिळे यांना घडलेला प्रकार कथन केल्यानंतर त्र्यंबक ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हणून लावले वेठबिगारीस…

– अवघ्या सहा वर्ष वयाच्या मुलीला 6000 रूपयात मेंढ्या चारण्यासाठी विकत घेतले.

मुलगी शाळेत जात असतांना तिला शिक्षणापासून वंचीत ठेवून शेळया मेंढयाचे शेण काढण्यास लावले.

– कातकरी समाजाच्या कुटुंबाच्या अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेतला.

मुलीला पोटभर अन्न देखील देत नसत

– पाच वर्ष घराकडे सोडले नाही

सकाळ पासून रात्री पर्यंत काम आणि काम

– झाडझुड स्वच्छता भांडी घासणे, मेंढया चारणे

– इतरत्र प्रकरण उघडकीस आल्यानंतर कारवाईच्या भितीने चिमुकलीला अखेर सुटका करुन आणून सोडले.

हेही वाचा:

Back to top button