J&K News : दुहेरी बस बॉम्बस्फोट प्रकरणी काही जणांना अटक | पुढारी

J&K News : दुहेरी बस बॉम्बस्फोट प्रकरणी काही जणांना अटक

पुढारी ऑनलाइन डेस्क : J&K News : जम्मू-काश्मीरमध्ये तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी बस बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी उधमपूरच्या बसंतगड परिसरातून काही लोकांना अटक केली आहे. अटक आरोपींची नावे अद्याप देण्यात आलेली नाही.

J&K News : जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूर जिल्ह्यात सलग 28 आणि 29 सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या बसमध्ये स्फोट झाले होते. या घटनेत दोन जण जखमी झाले होते. यापैकी पहिला स्फोट हा 28 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता डोमाईल भागातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या JK14D-6857 या बसमध्ये झाला होता. तर दुसरा स्फोट हा सकाळी 29 सप्टेंबरला सकाळी 6 वाजता उधमपूर बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये झाला होता.

J&K News : घटनेचा तपास घेत असताना जम्मू काश्मीर पोलिसांना असे आढळले की या दोन्हीही बस रामनगर या एकाच ठिकाणाहून उधमपूरला पोहोचल्या होत्या.

J&K News : दरम्यान, आज पहाटेपासून जम्मू काश्मीरमधील सोफियानच्या भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहे. काही दिवसांपूर्वीदेखील सोफियानच्याच भागात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातला होता.

हे ही वाचा :

J&K News : उधमपूर येथे बसमध्ये 24 तासात दुसरा स्फोट

 

Back to top button