नाशिक : नारळाच्या झाडानंतर आता बिबट्या चढला थेट शेतकऱ्याच्या बंगल्यावर | पुढारी

नाशिक : नारळाच्या झाडानंतर आता बिबट्या चढला थेट शेतकऱ्याच्या बंगल्यावर

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील सांगवी शिवारात नारळाच्या झाडावर झुंजणाऱ्या बिबट्यांपैकी एक येथून जवळच दीड हजार फुटावर असलेल्या एका रिकाम्या बंगल्यावर दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विजय घुमरे यांच्या बंगल्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी या बिबट्याला पाहिले. द्राक्ष बागेच्या जवळ खोल वाट परिसरात बंगल्यावर मुक्त संचार करताना बिबट्या दिसून आला.

रविवारी सायंकाळी शरद घुमरे यांच्या शेतातील वडाच्या झाडावरून उतरतानाही एक बिबट्या शेतकऱ्यांनी पाहिला. या झाडावरून त्या झाडावर आणि चक्क शेतकऱ्यांच्या बंगल्यावरही बिबट्या चा वावर आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नारळाच्या झाडाजवळ लावण्यात आलेल्या दोन पिंजऱ्यांपैकी एक पिंजरा बंदोबस्तासाठी मंगळवारी सकाळी खोल वाट परिसरात लावण्यात येणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा :

Back to top button