नाशिक : विद्यार्थिनीचा बनाव समोर आल्यानंतरही ‘त्या’ शिक्षकाची बदली | पुढारी

नाशिक : विद्यार्थिनीचा बनाव समोर आल्यानंतरही 'त्या' शिक्षकाची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देवगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षकाने आपणास मासिक पाळीच्या कारणास्तव वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याचा त्या विद्यार्थिनीचा बनाव समोर आल्यानंतरही संबंधित शिक्षकाची प्रतिनियुक्तीवर म्हैसगण आश्रमशाळेत बदली करण्यात आली. स्थानिकांचा रोष कमी करण्यासाठीच या शिक्षकाची बदली करण्यात आल्याचे आदिवासी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

गेल्या आठवड्यात देवगाव आश्रमशाळेतील इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्याच्या कारणातून वृक्षारोपण करण्यापासून शिक्षकाने मज्जाव केल्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते. अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांना चौकशीचे आदेश दिले होते. मीना यांच्या चौकशी अहवालात प्रकरण बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य कमी झाले.

दरम्यान, या प्रकरणानंतर आश्रमशाळेच्या परिसरातील ग्रामस्थांमध्ये विशेषत: पालकांमध्ये संताप होता. त्यातच हा प्रकारच बनाव असल्याचे समोर आल्याने आदिवासी विकास विभागाने संबंधित शिक्षकाची प्रतिनियुक्तीवर बदली करत या प्रकरणावर पडदा टाकला.

हेही वाचा :

Back to top button