नारायण राणे यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

नारायण राणे यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर लगेच त्यांना संगमेश्वर मधील गोळवली येथून रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणावर आज सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल झाल्या आहेत.

आज दिवसभर मंत्री नारायण राणे यांना अटकेच्या बातम्या माध्यांवरती दाखवण्यात येत होत्या. या बातम्यांचा संदर्भ घेत नेटकऱ्यांनी मीम्स बनवल्या आहेत. या मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

राणेंच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अटक करायला आलेले पोलिस अटक वॉरंट दाखवत नाहीत. अटक वॉरंट दाखवा असा सवाल आम्ही पोलिसांकडे केला. पण पोलिस आमच्यावर दबाव असल्याचे सांगत आहेत, असे जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अनेकांनी लगान चित्रपटातील फोटोंचा वापर करुन मीम्स बनवल्या आहेत. तर अनेकांनी मराठी चित्रपटातील फोटोंचा वापर केला आहे. या सर्व मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

राणेंच्या वक्तव्याशी सहमत नाही पण राणे यांच्या मागे खंबीर; देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे बोलण्याच्या भरात मुख्यमंत्र्याबाबत बोलले असतील. त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, नारायण राणे यांच्या मागे भाजप खंबीरपणे उभा असेल, अशी माहिती विराोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.

फडणवीस म्हणाले, 'नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे वाद उभा राहिला आहे. बोलण्याच्या भरात कदाचित ते वाक्य बोलले असतील. तसे वाक्य वापरल्याचे त्यांच्या मनात असेल असे वाटत नाही.

तथापि मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे त्या पदाबद्दल, व्यक्तीबद्दल बोतलाना संयम बाळगणे आवश्यक आहे.

वस्तुत: स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्व विसरता हे कुणाच्या मनामध्ये संताप तयार होऊ शकतो. परंतु तो वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जाऊ शकला असता.'

हे ही वाचलत का :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news