MHT CET 2024: एमएचटी सीईटीचा उद्या निकाल जाहीर होणार | पुढारी

MHT CET 2024: एमएचटी सीईटीचा उद्या निकाल जाहीर होणार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षाकक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल रविवारी (दि. १६) सायंकाळी ६ वाजता जाहीर होईल, अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे. MHT CET 2024

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक (MHT CET) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्या गुणांच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश केले जातात.

हेही वाचा 

MH CET Law 2024 : विधीच्या सीईटीची तारीख बदलली; आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा

MHT CET 2024: सीईटी परीक्षांच्या तारखा पुन्हा बदलल्या

CET | महत्वाची बातमी ! वेळापत्रकात बदल; असे असेल सुधारित वेळापत्रक

Back to top button