MHT CET 2024: सीईटी परीक्षांच्या तारखा पुन्हा बदलल्या | पुढारी

MHT CET 2024: सीईटी परीक्षांच्या तारखा पुन्हा बदलल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सीईटी परीक्षांच्या तारखांत पुन्हा बदल केला आहे. अभियांत्रिकी, 5- वर्षीय एलएलबी, नर्सिंग आणि इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पीसीबी (PCB) ग्रुपसाठी 22 ते 24 एप्रिल, 28 ते 30 एप्रिलदरम्यान तर पीसीएम (PCM) ग्रुपसाठी 2 ते 4 मे, 9 ते 11 मे आणि 15 ते 17 मे दरम्यान सीईटी परीक्षा होणार आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश (नीट) परीक्षा येत्या 5 मे रोजी होणार असल्यामुळे या दिवशी पीसीएम ग्रुपची कोणतीही परीक्षा होणार नाही, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. (MHT CET 2024)

MHT CET 2024
MHT CET 2024

हे ही वाचा:

Back to top button