नवी मुंबईत आजपासून पाणीबाणी | पुढारी

नवी मुंबईत आजपासून पाणीबाणी

वाशी : पुढारी वृत्तसेवा –  नवी मुंबई महापालिकेच्या मोरवे धरणामध्ये २८ टक्के म्हणजेच केवळ ४१ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीपुरवठा विभागाने पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. पूर्वी ज्या विभागांत दोन दिवस सायंकाळी पाणीकपात करण्यात आली होती, त्या विभागांमध्ये आता नवीन वेळापत्रकानुसार आठवड्यातून तीन दिवस सायंकाळी पाणीकपात करण्यात आली आहे. नवीन वेळापत्रक आज म्हणजेच १५ जूनपासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली. सकाळचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार असून, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

अधिक वाचा – 

उन्हाळ्यामध्ये पाणी बचत करता यावी, यासाठी प्रत्येक विभागात आठवड्यातून दोन दिवस सायंकाळी पाणीकपात चालू केली होती. सद्यस्थितीमध्ये धरणामध्ये ४१ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. केवळ २५ जुलैपर्यंत हे पाणी पुरू शकते. जूनचा अर्धा महिना होत आला, तरी म्हणावा तसा पाऊस धरण क्षेत्रात झालेला नाही.

अधिक वाचा – 

भविष्यात नवी मुंबईकराना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी आजपासून सायंकाळच्या पाणी कपातीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

अधिक वाचा – 

शहरातील सायंकाळच्या पाणीकपातीचे वेळापत्रक-

• बेलापूर विभाग : सोमवार, बुधवार, शुक्रवार.
• नेरूळ विभाग : मंगळवार, गुरुवार, शनिवार.
• तुर्भे विभाग: मंगळवार, गुरुवार, रविवार.
• वाशी विभाग : सोमवार, बुधवार, शुक्रवार.
कोपरखैरणे विभाग: मंगळवार, गुरुवार व शनिवार.
• घणसोली विभाग : बुधवार, शुक्रवार व रविवार,
• ऐरोली विभाग : मंगळवार, शुक्रवार तसेच
• सिडको नोड : सोमवार, गुरूवार व शनिवार.

Back to top button