Sheena Bora murder case : शीना बोरा हत्येतील हाडांचे अवशेष गायब सीबीआयची कबुली; हत्याकांड खटल्याला कलाटणी | पुढारी

Sheena Bora murder case : शीना बोरा हत्येतील हाडांचे अवशेष गायब सीबीआयची कबुली; हत्याकांड खटल्याला कलाटणी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा;  बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला नव्याने कलाटणी मिळाली आहे. १२ वर्षापूर्वी पेण पोलिसांना सापडलेले हाडांचे अवशेष गायब झाल्याचे उघड झाले आहे. हे अवशेष शोधूनही सापडले नाहीत, अशी स्पष्ट कबुलीच सीबीआयने गुरुवारी सत्र न्यायालयात दिली. शीना बोरा हत्याकांडात शीनाच्या हाडांचे अवशेष हा महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. SSheena Bora murder case

शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. नाईक निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे २०१२ मध्ये शीनाचा मृतदेह जाळण्यात आलेल्या ठिकाणी पेण पोलिसांना अवशेष सापडले होते. त्या अवशेषांची पहिली चाचणी जे. जे.रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खान यांनी केली होती. ते अवशेष मानवी हाडांचे असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.

डॉ. झेबा खान यांची साक्ष तपासली जाणार

या खटल्यात ९१ वे साक्षीदार म्हणून सीबीआयमार्फत जे. जे. रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खानची साक्ष तपासली जात आहे. मागील सुनावणीच्यावेळी सीबीआय वकील अॅड. सी. जे. नांदोडे यांनी पेण पोलिसांना १२ वर्षांपूर्वी सापडलेल्या अवशेषांची ओळख पटवण्याच्या हेतूने ते अवशेष खान यांना दाखवण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. मात्र सुनावणीच्या वेळी ते अवशेष सापडत नसल्याचे अॅड. नांदोडे यांनी सांगितल्याने आता या खटल्याला वेगळीच कलटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Sheena Bora murder case

हेही वाचा 

Back to top button