Mumbai Hoarding Collapse : अभिनेता कार्तिक आर्यनच्या सख्ख्या मामा-मामीचा मृत्यू, तीन दिवसांनी मृतदेह बाहेर काढले

Kartik Aaryan
Kartik Aaryan

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर दुर्घटनेमध्ये 18 लोकांना प्राण गमावावे लागले. या घटनेतील मृतांमध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्या नातेवाईकांचा समावेश होता. सोमवारी (दि.13) मुंबईत रोजी आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने घाटकोपरमधील पेट्रोल पंपावरील बेकायदेशीरपणे लावलेले मोठ्या आकाराचे होर्डिंग कोसळले. यामध्ये अनेक नागरिक त्याखाली अडकले. त्यातील काही लोकांची सुखरुप सुटका झाली आणि काहींना आपली जीव गमवावे लागला. या अपघातात कार्तिक आर्यनच्या मामा-मामींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कार्तिक आर्यनचे मामा मनोज चंसोरिया हे माजी एअर ट्रॅफिक कंट्रोल जनरल मॅनेजर होते. हे दोघेही जबलपूर येथील सिव्हिल लाइन्सच्या मरियम चौकात वास्तव्य करत होते. अपघातानंतर तीन दिवसांनी त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकचे मामा-मामी हे मुंबईत व्हिसाचे काम करण्यासाठी आले होते. त्यांचा मुलगा यश हा अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्याच्याकडे ते अमेरिकेत जाणार होते. मुंबईहून परत जबलपूरला जाताना कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी घाटकोपरच्या पेट्रोल पंपवर गेले होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला.

वडिलांचा शेवटचा फोन घाटकोपर दुर्घटनास्थळी

घाटकोपर या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मनोज हे या पेट्रोल पंपावर आले होते, त्याचवेळी होर्डिंग कोसळलं. मनोज आणि त्यांच्या पत्नी ढिगाऱ्याखाली अडकल्या. त्यांचा मुलगा काल अमेरिकमधून वडिलांना फोन करत होता, मात्र वडिलांनी फोन न उचलल्याने मुलगा घाबरला. त्यानंतर मुलाने त्याच्या मित्रांना फोन करून सांगितलं की, माझ्या वडिलांना काय झाले, बघा वडील फोन उचलत नाही, मग मुलाच्या मित्रांनी शोध मोहीम सुरू केली.

यानंतर त्याच्या मित्रांनी अंधेरी पूर्वेत येथे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मनोज यांचा मोबाईल ट्रॅक केला. त्यानंतर मनोज यांचे लोकेशन या घाटकोपरच्या पेट्रोल पंप दाखवल्यावर पोलीस या घटनास्थळी दाखल झाले. मुलाच्या मित्रांना कळवलं नंतर मनोज यांचे लोकेशन गुगल मॅपवर सर्च केलं, त्यात अंतर बाय वॉक दाखवलं. त्यानंतर पोलिसांना लोकेशन दुर्घटनास्थाळी दाखवल्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाचा जवानाला आपल्यासोबत घेऊन जाऊन मनोज यांचा मोबाईल ढिगाऱ्याखालून मिळाला.

तीन दिवसानंतर मृतदेहाची ओळख पटली…

घटनास्थळी पोलिसांना दोन मृतदेह आढळले होते. घटनेच्या तीन दिवसानंतर मृतदेह सापडल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड झाले होते. त्याच्या हातातील अंगठीवरून मृत व्यक्ती मनोजच आहेत अशी ओळख पटवण्यात आले. या नंतर गुरुवारी कार्तिक आर्यनच्या मामा-मामींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news