मोठी बातमी! महायुतीची लोकसभेसाठी यादी जाहीर | पुढारी

मोठी बातमी! महायुतीची लोकसभेसाठी यादी जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत कमालीचा सस्पेन्स होता. मात्र हा सस्पेन्सला आता संपला आहे. महायुतीने आज राज्यातील काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजपला मिळालेल्या जागा

गडचिरोली, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, रावेर, नंदुरबार, धुळे, भिवंडी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पूर्व, सांगली, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद , बीड, जालना, सोलापूर, माढा, लातूर, नांदेड आणि जालना.

शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळालेल्या जागा

रामटेक, यवतमाळ-वाशीम, मावळ, हिंगोली, कल्याण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, पालघर, शिर्डी, कोल्हापूर आणि हातकणंगले.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या जागा

बारामती, शिरूर, उस्मानाबाद आणि परभणी या जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यांना नाशिक किंवा बुलढाणा यापैकी एक मिळण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या यादीकडे अनेकांचे लक्ष लागून राहीले होते. आज यातील काही नावांची घोषणा झाल्याने आता मोठा तिढा सुटल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. लोकसभा २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता एक महिन्यापेक्षाही कमी काळ शिल्लक राहिलेला आहे. महायुतीकडून ज्या जागांवर शिक्कामोर्तब झाला आहे त्याठिकाणी प्रचार सभांना वेग येणार आहे.

हेही वाचा

 

Back to top button