Lok Sabha Election 2024 :अखेर महादेव जानकर ‘महायुती’त सहभागी | पुढारी

Lok Sabha Election 2024 :अखेर महादेव जानकर 'महायुती'त सहभागी

 पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेले अनेक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला पाठिंबा देणार अशा चर्चा होत्या. आज याबाबतची एक मोठी अपडेट समोर आली आहे. जानकर यांनी महायुतीत सहभागी झाले असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने भाजप सूत्रांच्‍या हवाल्‍याने दिले आहे.  दरम्‍यान, महादेव जानकर यांच्या पक्षाला लोकसभेची एक जागा दिली जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. रासपचे नेते महादेव जानकर यांनी  महायुतीत सहभागी हाेण्‍याचा निर्णय जाहीर केला. माढा आणि परभणी येथून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आज त्यांनी जाहीर केलेल्या निर्णयानंतर आता ते महायुतीसोबत राहतील हे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडे त्यांनी तीन जागा मागितल्याच्या चर्चा होत्या. मात्र एक जागा निश्चिच होण्याची  शक्‍यता असल्‍याचे सुनील तटकरे यांनी म्‍हटले आहे.

Back to top button