राज्यातील १५ पालिकांमधील ३४ अधिकाऱ्यांच्या बदल्या   | पुढारी

राज्यातील १५ पालिकांमधील ३४ अधिकाऱ्यांच्या बदल्या  

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५  महानगरपालिकेमधील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त संवर्गातील ३४ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, सांगलीचे आयुक्त सुनील पवार, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व  केशव जाधव,  वसई -विरार महापालिकेतील पाच  उपायुक्त,  नवी मुंबईचे चार उपायुक्तांच्या समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशावरून वसई विरार महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, डॉ विजय द्वासे, तानाजी नरळे,  चारुलता पंडित, नयना ससाणे यांची बदली झाली आहे.  नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त बाळासाहेब राजळे, मनोज महाले, श्रीराम पवार,  भिवंडीचे दीपक झिंझाड, पनवेल महापालिकेतील उपायुक्त  सचिन पवार, गणेश शेटे, कोल्हापूरच्या उपायुक्त शिल्पा दरेकर आणि उल्हासनगरचे विजय नाईकवाडे यांची बदली झाली आहे.
नागपूर महापालिकेचे उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, पिंपरी चिंचवडचे अजय चारठाणकर, मिनीनाथ दंडवते,.  नाशिकचे श्रीकांत पवार, लक्ष्मीकांत साताळकर,  छत्रपती संभाजी नगरचे अतिरिक्त आयुक्त  सौरभ जोशी,  उपायुक्त नंदा गायकवाड, सांगली मिरजचे पंडित पाटील,   राहुल रोकडे,  अहमदनगरचे सचिन बांगर, अजित निकत,  नांदेड महापालिकेचे पंजाब खानसोले , धुळ्याच्या पल्लवी शिरसाठ, लातूरच्या मयुरा शिंदेकर, चंद्रपूरचे उपायुक्त  अशोक गराटे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही.

Back to top button