Manoj Jarange patil : मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची खलबते | पुढारी

Manoj Jarange patil : मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची खलबते

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी आज (दि.२५) आक्रमक भूमिका घेतली आहे. ते आता थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर ते मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. Manoj Jarange patil

जरांगे गंगापूर, येवला, नाशिक मार्गे जरांगे मुंबईला निघाले आहेत. दरम्यान, गेल्या १५ ते १६ दिवसांपासून ते उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली दिसत आहे. जरांगे यांना मराठा बांधव मुंबईला जाण्याचा आग्रह सोडावा, अशी विनंती करत आहेत. तसेच ते जात असलेल्या मार्गावर झोपून जरांगे यांना मुंबईला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही केला. मात्र, काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते पुढे मार्गस्थ झाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. Manoj Jarange patil

दरम्यान, जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर सोमवारपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. जरांगेंच्या भूमिकेचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे. त्यामुळे कालपासून मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. त्यांनी सांगितले. तर एका मिनिटांत सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईल, असे जरांगे म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button