मी दिलेला निर्णय पूर्ण कायदेशीर : राहुल नार्वेकर | पुढारी

मी दिलेला निर्णय पूर्ण कायदेशीर : राहुल नार्वेकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी दिलेला निर्णय पूर्ण कायदेशीर आहे. संविधान, विधानसभेचे नियम आणि पुराव्यांच्या आधारेच मी निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ निर्णय देताना दिला. मनाविरूद्ध निकाल दिला की विरोधक टीका करतात, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील १० आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शरद पवार गटाचे जयंत पाटील, अनिल देशमुखांसह १० आमदारांना नोटीस बजावली. या सर्वांना ११ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी १४ मार्चला निश्चित केली आहे.

आज माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, कोर्टात जाणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण कोर्टात गेल्याने माझा निर्णय चुकीचा असे होत नाही. विरोधात निर्णय आल्यानंतर टीका केली जाते. अध्यक्ष आणि कोर्टाबद्दल याआधी चुकीची वक्तव्य केली गेली आहेत. माझ्यावर दबाव टाकण्यासाठी आरोप होतात. मी दिलेला निर्णय पूर्ण कायदेशीर असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button