license : जन्म होण्याअगोदरच लायसन्स केले जारी!; परिवहन विभागाचा भोंगळ कारभार | पुढारी

license : जन्म होण्याअगोदरच लायसन्स केले जारी!; परिवहन विभागाचा भोंगळ कारभार

कांदिवली : पुढारी वृत्तसेवा :  वसईमध्ये भयानक प्रकार समोर आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई परिक्षेत्रातील लायसन्सधारक किशोर पवार यांच्या लायसन्सवर लायसन्स देण्याची तारीख 21/1/1987 अशी आहे तर त्यांची जन्मतारीख 9/8/1988 अशी आहे. याचा अर्थ जन्म होण्या अगोदरच लायसन्स दिल्याचे परिवहन विभागाच्या अभिलेखातून दिसून येते. नियमानुसार दुचाकी वाहन चालवण्याचे लायसन्स हवे असल्यास अर्जदाराने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असावी, अशी अट आहे. ( license )

संबंधित बातम्या 

जेव्हापासून ऑनलाईन प्रक्रियेत कामकाजास सुरुवात झाली तेव्हा पासून आधार कार्ड, पॅन कार्ड, पी पी एफ यातील त्रुटीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राकडून काही चूक झाल्यास त्याची जबादारी संबंधित कार्यालय, परिवहन विभाग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र घेत नाही. मात्र, याबद्दलचा आर्थिक भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.

महाराष्ट्र शासनाचे परिवहन विभागातील वाहन व सारथी प्रणालीत ऑनलाईन स्वरूपात अर्ज दाखल करून कामे केली जात आहेत. त्यातील वाहन प्रणालीत वाहने संदर्भातील विविध प्रकारची तर सारथी प्रणालीत लायसन्सची विविध कामे केली जात आहेत.

ऑनलाईन प्रणालीचा फटका

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांनी सुरुवातीला लायसन्सबाबत ऑनलाईन प्रणालीचा वापर केला तेव्हा अनेकांच्या लायसन्समध्ये बदल झालेले दिसून आले. त्यात लायसन्स वरील फोटो बदली होणे, तर काही जणांची लिंगबाबत लायसन्सवर असलेली नोंदणी चुकली आहे. यासंदर्भात दुरूस्ती करताना नागरिकांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. ( license )

Back to top button