नवी मुंबईत वर्षभरात ६६५६ गुन्हे दाखल; ४८९२ गुन्हे उघडकीस | पुढारी

नवी मुंबईत वर्षभरात ६६५६ गुन्हे दाखल; ४८९२ गुन्हे उघडकीस

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा नवी मुंबईत सन 2023 मध्ये 6656 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 4892 गुन्हे उघडकीस आले असून, प्रमाण 73% एवढे आहे. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये 6% गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात वाढ झाल्‍याची माहिती वार्षिक गुन्हे आढावा पत्रकार परिषदेत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी दिली.

2023 मध्ये मालमत्तेचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले. 2348 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1170 गुन्हे म्हणजे 50% गुन्हे उघडकीस आले. आर्थिक फसवणुकीचे 812 गुन्हे दाखल झाले असून, 462 गुन्हे उघडकीस आले. त्याचे प्रमाण 57 % आहे. महिलांबाबत 703 गुन्हे दाखल तर 698 गुन्हे उघडकीस आले. अपहरणाचे 2023 मध्ये 108 मुलांचे अपहरण झाले होते. त्यापैकी 100 मुले मिळून आली आहेत, तर 299 मुलींचे अपहरण झाले असून, 262 मुली मिळून आल्या आहेत.

बेपत्ता पुरूष 797 पैकी 593 मिळून आले, तर महिला 1033 असून 800 बेपत्ता महिला मिळून आल्या. 2023 मध्ये सायबर गुन्ह्यांची मोठी नोंद झाली. एकूण 403 गुन्हे दाखल झाले त्यापैकी 76 गुन्हे उघड झाले. सायबर फसवणुकीच्या 303 गुन्ह्यांमध्ये 47.85 कोटींची फसवणूक झाली होती. त्यापैकी 33.83 कोटी रूपयांची रक्कम गोठविण्यात आली. एनसीसीआरपी पोर्टलवर 7091 तक्रारी आल्या. त्यामध्ये 67.71 कोटींची फसवणूक झाली असून 6.78 कोटीची रक्कम गोठविण्यात आली. सायबर पोलीस ठाण्यात 38 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 9 आणि इतर पोलीस ठाण्यातील 4 गुन्हे उघडकीस आले. 14,46,82,264 रूपयांची फसवणूक झाल्याची नोंद आहे. त्यापैकी 33,72,39,889 रक्कम गोठवली असून न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदारांनी ही रक्कम परत केली जाणार आहे.

अंमली पदार्थ बाळगणे 89 आणि सेवनच्या 290 कारवाई झाली. वर्षभरात 21,12,97,456 रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 2023 मध्ये अंमली पदार्थच्या 290 केसेस दाखल 301 भारतीय पुरूष तर 30 परकीय नागरिक आणि सात परकीय महिला असे एकूण 353 आरोपींवर कारवाई केली. 2023 मध्ये पीटा 29, जुगार 48, बार आस्थापना 58, गुटखा 105, कोटपा 38 आणि हुक्का 41 प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. 2023 मध्ये 9 बार व ऑकेस्ट्रा परवाने निलंबित तर दोन परवाने कायम स्वरूपी रद्द केले. नेल्सन प्रणालीमुळे गुन्हे आणि अर्ज निकालीचे प्रमाणात 14% वाढ झाली. सन 2023 मध्ये एफआरआरओ विभाग नवी मुंबई पोलीसांनी 483 अवैध वास्तव्य करणा-या परदेशी नागरिकांना लिव्ह इंडिया नोटीस बजावली. न्यायालयाच्या आदेशाने 23 परदेशी नागरिकांना त्यांच्या मुळ देशात डिपोर्ट केले आहे.

पोलीसांच्या कुटूंबियांना, गुणवत्ताधारक पाल्यांना, सदृढ बालिका योजनेंतर्गत 266 पोलीस पाल्यांना 16.66 लाख रक्कमेचे पोलीस कल्याण निधीतून वाटप केले.

हेही वाचा :

Back to top button