VBA On MVA: ‘मविआ’च्या बैठकीबाहेर ‘वंचित’चे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर तिष्ठत | पुढारी

VBA On MVA: 'मविआ'च्या बैठकीबाहेर 'वंचित'चे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर तिष्ठत

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपा संदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक मुंबईत बोलाविण्यात आली होती. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर गेले होते. दरम्यान, त्यांना १ तास बैठकीबाहेर बसवून ठेवण्यात आले. यावर पुंडकर यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. VBA On MVA

महाविकास आघाडीची मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये आज बैठक होती. यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. त्यावेळी डॉ. पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडीसमोर सादर केला. तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो, असे म्हणून त्यांना १ तास बैठकीबाहेर बसवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये आघाडीतील तीन पक्षांची बैठक सुरू होती. आजच्या बैठकीत मिळालेल्या वागणुकीबाबत डॉ. पुंडकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. VBA On MVA

हेही वाचा 

Back to top button