Electric Vehicle : इलेक्ट्रिकवर धावतोय महाराष्ट्र! | पुढारी

Electric Vehicle : इलेक्ट्रिकवर धावतोय महाराष्ट्र!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईकरांसह महाराष्ट्रवासीय पर्यावरणस्नेही होत असल्याचे राज्यातील वाढत्या इलेक्ट्रिकल वाहनांच्या (ईव्ही) संख्येवरून दिसते. राज्यात इलेक्ट्रिकल वाहनांची संख्येत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रातील चार लाख इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये २९ हजार इलेक्ट्रिक कार्स आणि ३ लाख ४० हजार ई-बाईक्सचा समावेश आहे. मुंबईकरही पर्यावरणपूरक वाहनांना पसंती देत आहेत. २०२३ मध्ये मुंबईत १३ हजार ३५ नव्या इलेक्ट्रिकल वाहनांची नोंदणी झाली.
मुंबईत सध्या ३२ हजार ३४७ इलेक्ट्रिक वाहने असून, त्यात सुमारे २० हजार ई-बाईक्स आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अवघ्या १ टक्क्याने वाढली असली तरी २०१९ च्या कोविडपूर्व कालावधीच्या तुलनेत ती वाढ ४२ पटींनी अधिक असल्याचे आकडेवारी सांगते.

उत्तर प्रदेशात ७ लाख वाहने

इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागला आहे. या राज्यात एकूण ७ लाख वाहने आहेत, तर महाराष्ट्रात ४ लाख वाहनांची नोंद आहे.

इलेक्ट्रिक कारमध्ये महाराष्ट्र पहिला

देशात इलेक्ट्रिक कारच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. महाराष्ट्रात २९ हजार इलेक्ट्रिक कार आहेत, तर कर्नाटकमध्ये १९ हजार ५००, केरळ १६ हजार, तर दिल्ली व तमिळनाडूत प्रत्येकी १२ हजार इलेक्ट्रिक कार्सची नोंद आहे.

Back to top button