सरसकट कुणबीला कोकणातील मराठ्यांचा विरोध; चिपळूण येथे १७ जानेवारीला मेळावा | पुढारी

सरसकट कुणबीला कोकणातील मराठ्यांचा विरोध; चिपळूण येथे १७ जानेवारीला मेळावा

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : सरसकट कुणबी दाखले देण्यास कोकणातील मराठ्यांचा विरोध आहे. मराठ्यांना आरक्षण हे मराठा म्हणूनच आणि ते ही टिकणारे मिळावे, या मागणीसाठी १७ जानेवारीरोजी चिपळूण येथे (जि. रत्नागिरी) कोकण मराठा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी क्षत्रिय मराठा समाजातर्फे मुंबईत शनिवारी (दि.३०) मुंबईस्थित कोकणातील मराठा समाजाची बैठक होणार आहे. Maratha Reservation

परेल येथील सेंट्रल वर्कशॉप समोरील क्षत्रिय भावसार महाजनवाडी सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता होणाऱ्या या बैठकीला कोकणवासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्षत्रिय मराठा कोकण समन्वयक राजन घाग यांनी आज (दि. २७) केले.
राजन घाग म्हणाले की, मराठा आरक्षण सद्यस्थिती आणि कोकणातील मराठ्यांची भूमिका, कुणबी म्हणून आरक्षण घेण्यास विरोध मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच आणि ते ही टिकणारे मिळावे, ही भूमिका या बैठकीत घेण्यात येणार आहे. याचबरोबर कोकणातील मुंबई स्थित मराठ्यांचे संघटन करुन त्यामार्फत शिक्षण, नोकरी, व्यवसायामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व ‘सारथी’मधून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे व अडीअडचणीला आपल्या मदतीला उभे राहणारे एक मजबूत संघटन उभे करणे, हा उद्देश आहे. Maratha Reservation

हेही वाचा   

Maratha Reservation | मोठा दिलासा! मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारलीफेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण देणार : मुख्यमंत्री शिंदे

मराठा आरक्षण : ‘१७ डिसेंबर सरकारसाठी पुन्हा नवा अल्टिमेटम’ ; जरांगे-पाटील ठरवणार रणनीती

Back to top button