मुंबई : चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ मद्यधुंद कारचालक महिलेची चौघांना धडक! | पुढारी

मुंबई : चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ मद्यधुंद कारचालक महिलेची चौघांना धडक!

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ एका मद्यधुंद महिला कार चालकाने चौघांना धडक दिल्याची घटन (शनिवार) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चौघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेंबूर कॅम्प बॅरेक मध्ये राहणारे दिपू राम आसरे जयस्वाल हे आपल्या स्कुटीवरून डायमंड गार्डन येथून चेंबूर कॅम्पच्या दिशेने जात होते. यावेळी सायनच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने त्‍यांना धडक दिली. यामध्ये स्कुटीवर असलेले दिपू जयस्वाल, त्यांचा मुलगा हर्ष (वय १६), मुलगी समृद्धी (१०), मेव्हूण्याची मुलगी उन्नती (१२) जखमी झाले. जयस्वाल यांनी सदर महिलेला जाब विचारला असता कारचालक महिलेने त्यांनाच शिवीगाळ केली. सदर कारचालक महिला मद्यधुंद असल्याचे निदर्शनास आले. चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मद्यधुंद महिला कार चालकाला ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा :

Back to top button