Maharashtra NCP | शरद पवार यांच्या गुप्तभेटीवर अजित पवारांचा मोठा खुलासा, ‘बैठकीत वेगळं काही…’ | पुढारी

Maharashtra NCP | शरद पवार यांच्या गुप्तभेटीवर अजित पवारांचा मोठा खुलासा, 'बैठकीत वेगळं काही...'

पुढारी ऑनलाईन : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा तरंग निर्माण झाले. परंतु शरद पवारांनी यावर खुलासा करताच, हे तरंग शांत झाले. यानंतर आज स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापुरात (Ajit Pawar) उपस्थित होते. दरम्यान, माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ‘मी त्यांचा नात्याने पुतण्या लागतो, असे म्हणत शरद पवार यांच्या गुप्तभेटीवर पडदा टाकला. (Maharashtra NCP)

पुढे अजित पवार म्हणाले, पुण्याच्या बैठकीचे मनावर घ्यायचे कारण नाही. पवार साहेबांनी स्वत: सांगितले आहे की, पवार कुटुंबातील ते वडीलधारी ज्येष्ठ व्यक्ती आहेत. मी त्यांचा नात्याने पुतण्या लागतो. घरातील व्यक्तींना भेटायला कारण लागत नाही, त्यामुळे माध्यमांनी या बैठकीत वेगळं काही घडले असे समजू नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.

मी उधळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मी कोणालाही चोरून भेटलो नाही. दरम्यान चोरडिया हे पवार साहेबांचे क्लासमेंट होते. त्यांच्या कुटुंबाशी आमचे दोन पिढ्यांचे संबंध आहेत. व्हीएसआयच्या बैठकीला आम्ही सगळे आलो होतो. यावेळी एकत्र भोजनाचा योग आला यात वेगळं काय आहे? असा सवाल करत, उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांपुढे आपली भूमिका मांडली. (Maharashtra NCP)

कोल्हापूरातील विकास कामांची माहिती घेतली. दरम्यान, कोल्हापुरातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मराठा आरक्षण संदर्भातही महत्त्वाची माहिती दिली आहे. विविध शिष्टमंडळानी भेटी घेतल्या. दरम्यान, चर्चा झाली आहे, असे पवार यांनी माध्यमांना सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button