Kolhapur News | मराठा आरक्षणाबाबत मुंबईत बैठक घेतली जाईल : उपमुख्यमंत्री अजित पवार

Kolhapur News | मराठा आरक्षणाबाबत मुंबईत बैठक घेतली जाईल : उपमुख्यमंत्री अजित पवार
Published on
Updated on

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्‍तसेवा, आज मराठा आरक्षण प्रश्न बैठकीत गोंधळ झाला. पुण्याहून आलेल्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला नसल्याने संतप्त भावना व्यक्‍त करण्यात आल्‍या. या दरम्यान मराठा आरक्षणाबाबत मुंबईत बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत सकल मराठा समाजाच्या मागणी बाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली. (Kolhapur News)

हद्दवाढ प्रश्नी पुढील पन्नास वर्षांचा विचार करून सर्वच राजकीय पक्षांनी कठोर निर्णय घ्यायला हवा, असेही पवार यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा यावेळी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर पवार यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. (Kolhapur News)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news