शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिळणार बेदाणा | पुढारी

शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिळणार बेदाणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शालेय पोषण आहारात आता यापुढे विद्यार्थ्यांना बेदाणा देण्यात येणार आहे. फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी बुधवारी विधानसभेत ही घोषणा केली. आठवड्यातून किमान एक दिवस तरी विद्यार्थ्यांना बेदाणा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे बेदाणा उत्पादक शेतकर्‍यांना एकप्रकारे मदत होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागणी नसल्यामुळे हजारो टन शीतगृहात पडून असलेल्या बेदाण्यामुळे शेतकर्‍यांवर संकट ओढावले आहे. त्यामुळे कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून असलेल्या बेदाण्यावर बँकांकडून आकारण्यात येणारे व्याज सरकारने भरावे, अशी मागणी बबनराव शिंदे यांनी केली.

Back to top button