परमबीर सिंग विरुद्ध मुंबई गुन्हे शाखा न्यायालयात | पुढारी

परमबीर सिंग विरुद्ध मुंबई गुन्हे शाखा न्यायालयात

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : समन्सना दाद न देणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने न्यायालयात धाव घेतली आहे.

गोरेगावचे बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास सध्या मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. गुन्हे शाखेने 12 ऑक्टोबरचे समन्स बजावूनही परमबीर बधले नाहीत.

ते नॉट रीचेबल झाल्याने गुन्हे शाखेने हे समन्स त्यांच्या मलबार हिल येथील घरावर चिकटवले होते. शेवटी गुन्हे शाखेने न्यायालयात धाव घेत परमबीर सिंग यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी अर्ज केला आहे.

Back to top button