Share Market Closing Bell | सेन्सेक्स २९७ अंकांनी वाढून बंद, IT स्टॉक्स वधारले, फार्मा गडगडले | पुढारी

Share Market Closing Bell | सेन्सेक्स २९७ अंकांनी वाढून बंद, IT स्टॉक्स वधारले, फार्मा गडगडले

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज चढ-उतार दिसून आला. डिफॉल्ट टाळण्यासाठी अमेरिका लवकरच कर्ज मर्यादा डील पर्यंत पोहोचेल या शक्यतेने आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत आज भारतीय शेअर बाजाराने आज तेजीत सुरुवात केली होती. पण त्यानंतर काही वेळ दोन्ही निर्देशांकांची घसरण पाहायला मिळाली. पण पुन्हा त्यांनी तेजीच्या दिशेने वाटचाल केली. सेन्सेक्स आज ट्रेडिंग सत्रात २९७ अंकांनी वाढून ६१,७२९ वर बंद झाला. तर निफ्टी ७३ अंकांच्या वाढीसह १८,२०३ वर स्थिरावला. आजच्या तेजीत IT, ऑटो स्टॉक्स आघाडीवर राहिले. तर फार्मा स्टॉक्स आज गडगडले. (Share Market Closing Bell)

बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स १५० हून अधिक अंकांनी वाढला होता. त्यानंतर सकाळी १०.४२ च्या सुमारास सेन्सेक्स सुमारे १६१ अंकांच्या घसरणीसह ६१,२७० वर आला. तर निफ्टी १८ हजारांवर होता. त्यानंतर पुन्हा सेन्सेक्स आणि निफ्टीने नुकसान मागे टाकत तेजीत व्यवहार केला. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर (BSE Sensex) टाटा मोटर्सचा (Tata Motors) शेअर्स ३.२२ टक्के वाढून ५२४ रुपयांवर पोहोचला. इन्फोसिस (Infosys), टेक महिंद्रा, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्सदेखील वाढले. तर एनटीपीसी, एशियन पेंट्स, टायटन, मारुती, पॉवर ग्रिड, टाटा स्टील (Tata Steel) हे शेअर्स घसरले.

ऑटोमध्ये ‘हे’ शेअर्स टॉप गेनर्स

आज ऑटो स्टॉक्स वधारल्याचे दिसून आले. Tata Motors चा शेअर आज २ टक्क्यांहून अधिक वाढून ५१९ रुपयांवर पोहोचला. महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, अशोक लेलँड हे शेअर्सदेखील आज ऑटो स्टॉक्समधील तेजीत टॉप गेनर्स होते.

Bata India चे शेअर्स वाढले

फूटवेअर मेकर Bata India ने अपेक्षेपेक्षा चांगला नफा तिमाहीत नोंदवल्यानंतर त्यांचे शेअर्स सुमारे ४ टक्के वाढले. कच्च्या मालाची किंमत कमी झाली असून बाटाच्या Hush Puppies सारख्या ब्रँडची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर bata india share price मध्ये वाढ झाली. आज या शेअरची किंमत १,५५२ रुपयांवर गेली. दरम्यान, Tata Elxsi च्या शेअरमध्ये चौथ्या तिमाही निकालानंतर ४ टक्के घसरण झाली. (Stock Market Updates)

अदानींच्या शेअर्सची उसळी

अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात नियामक व्यवस्था फोल ठरल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या न्या. सप्रे समितीने काढला आहे. अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने नेमलेल्या विशेषतज्ज्ञ समितीचा अहवाल शुक्रवारी सार्वजनिक करण्यात आला. या अहवालानंतर अदानी समुहाला मोठा दिलासा मिळाला आहे. अदानी समुहाने कुठलीही आर्थिक माहिती लपवली नसल्याचे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या १७३ पानी अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सर्वोच्य न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीकडून दिलासा मिळाल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group stocks) दुपारच्या सत्रात सुमारे ४ टक्क्यांपर्यंत वधारले. बीएसईवर अदानी एंटरप्रायजेसचा (Adani Enterprises) शेअर ३.९२ टक्के वाढून १,९६२ रुपयांवर पोहोचला. याआधी हा शेअर १,८८८ रुपयांवर बंद झाला होता. मात्र, यंदा हा शेअर ४९ टक्क्यांनी खाली आला आहे. एका वर्षात अदानी एंटरप्रायजेसचा शेअर ७.४१ टक्क्यांनी घसरला आहे. दुपारच्या ट्रेडिंग सत्रात अदानी एंटरप्रायजेसचे बाजार भांडवल २.२२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. त्यांच्या एकूण २.२४ लाख शेअर्सनी बीएसईवर ४२.७८ कोटी रुपयांचा व्यवहार केला. आज दुपारच्या सत्रात अदानी टोटल गॅस वगळता अदानी समूहाचे इतर शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत वाढले. अदानी विल्मरचा शेअर ४.३ टक्के वाढून ३९४.३५ रुपयांवर पोहोचला, तर अदानी पोर्ट्सचा शेअर बीएसईवर ६६३९० रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत २.७५ टक्के वाढून ६८२.२० रुपयांवर पोहोचला.

ऊर्जा क्षेत्रातील अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर बीएसईवर ३.५४ टक्के वाढून ८९२ रुपयांवर पोहोचला. अदानी पॉवरचे शेअर्सही बीएसईवर मागील बंदच्या 225.10 रुपयांच्या तुलनेत 4.13% वाढून 234.4 रुपयांवर पोहोचले. अदानी ट्रान्समिशनचा शेअर दुपारच्या व्यवहारात ७५१.३५ रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत २.२० टक्के वाढून ७६७.९० रुपयांवर पोहोचला. दरम्यान, बीएसईवर अदानी टोटल गॅसचा शेअर अजूनही ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये असून ६३३.३५ रुपयांपर्यंत खाली आला. (Share Market Closing Bell)

हे ही वाचा :

Back to top button