Adani Group stocks | सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून दिलासा, अदानींचे शेअर्स वधारले, जाणून घ्या कोणता शेअर्स किती वाढला?

Adani Group stocks | सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून दिलासा, अदानींचे शेअर्स वधारले, जाणून घ्या कोणता शेअर्स किती वाढला?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात नियामक व्यवस्था फोल ठरल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या न्या. सप्रे समितीने काढला आहे. अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने नेमलेल्या विशेषतज्ज्ञ समितीचा अहवाल शुक्रवारी सार्वजनिक करण्यात आला. या अहवालानंतर अदानी समुहाला मोठा दिलासा मिळाला आहे. अदानी समुहाने कुठलीही आर्थिक माहिती लपवली नसल्याचे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या १७३ पानी अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सर्वोच्य न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीकडून दिलासा मिळाल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group stocks) दुपारच्या सत्रात सुमारे ४ टक्क्यांपर्यंत वधारले. बीएसईवर अदानी एंटरप्रायजेसचा (adani enterprises share price) शेअर ३.९२ टक्के वाढून १,९६२ रुपयांवर पोहोचला. याआधी हा शेअर १,८८८ रुपयांवर बंद झाला होता. मात्र, यंदा हा शेअर ४९ टक्क्यांनी खाली आला आहे. एका वर्षात अदानी एंटरप्रायजेसचा शेअर ७.४१ टक्क्यांनी घसरला आहे. दुपारच्या ट्रेडिंग सत्रात अदानी एंटरप्रायजेसचे बाजार भांडवल २.२२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. त्यांच्या एकूण २.२४ लाख शेअर्सनी बीएसईवर ४२.७८ कोटी रुपयांचा व्यवहार केला.

आज दुपारच्या सत्रात अदानी टोटल गॅस वगळता अदानी समूहाचे इतर शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत वाढले. अदानी विल्मरचा शेअर ४.३ टक्के वाढून ३९४.३५ रुपयांवर पोहोचला, तर अदानी पोर्ट्सचा शेअर बीएसईवर ६६३९० रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत २.७५ टक्के वाढून ६८२.२० रुपयांवर पोहोचला.

ऊर्जा क्षेत्रातील अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर बीएसईवर ३.५४ टक्के वाढून ८९२ रुपयांवर पोहोचला. अदानी पॉवरचे शेअर्सही बीएसईवर मागील बंदच्या 225.10 रुपयांच्या तुलनेत 4.13% वाढून 234.4 रुपयांवर पोहोचले. अदानी ट्रान्समिशनचा शेअर दुपारच्या व्यवहारात ७५१.३५ रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत २.२० टक्के वाढून ७६७.९० रुपयांवर पोहोचला. दरम्यान, बीएसईवर अदानी टोटल गॅसचा शेअर अजूनही ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये असून ६३३.३५ रुपयांपर्यंत खाली आला.

हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाल्याने पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये समूहाच्या शेअर्समध्ये मोठी अस्थिरता दिसून आली होती, असे देखील तज्ज्ञ समितीच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. अदानी समुहात गुंतवणूक केलेल्या १३ विदेशी कंपन्यांचा प्रवर्तकासोबत संबंध असावा, अशी शंका सेबीला आहे, अशी टिप्पणी समितीने केली आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत न्या. जे. पी. देवधर, ओपी भट, एम. व्ही. कामथ, नंदन नीलकणी तसेच सोमशेखर सुंदरेशन यांचा समावेश होता.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news