Stock Market Opening Bell | सेन्सेक्स ६०० अंकांनी वधारला, ‘हे’ शेअर्स आघाडीवर | पुढारी

Stock Market Opening Bell | सेन्सेक्स ६०० अंकांनी वधारला, 'हे' शेअर्स आघाडीवर

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) आज सोमवारी (दि.९) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ६०० हून अधिक अंकांनी वाढून ६१,६८० वर पोहोचला. तर निफ्टी १७५ अंकांच्या वाढीसह १८,२४० वर होता. आज सेन्सेक्स, निफ्टी १ टक्के वाढले आहेत. बाजारातील तेजीत बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर होते.

सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, कोटक बँक, टाटा मोटर्स आणि एचडीएफसी हे शेअर्स टॉप गेनर्स होते. हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, विप्रो, नेस्ले, मारुती, एचडीएफसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्सदेखील वधारले आहेत. सन फार्मा, एलटी, टाटा स्टील, इन्फोसिस हे शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. (Stock Market Opening Bell)

मार्च तिमाहीत तोटा लक्षणीयरित्या कमी केल्यानंतर पेटीएमचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांनी वाढले. भारतातील सर्वात मोठी आणि तेलंगणातील पहिली गिगाफॅक्टरी लॉन्च केल्यानंतर अमरा राजा बॅटरीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले आहेत.

सुमारे १,४४२ शेअर्स वाढले असून ६१० शेअर्स घसरले आहेत. तर १४० शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आलेला नाही. आशियाई बाजारांतही सोमवारी तेजी दिसून येत आहे. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ६ पैशांनी वाढून ८१.७२ वर पोहोचला.

 हे ही वाचा :

Back to top button