Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिग दुर्घटना; फडणवीस यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश | पुढारी

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिग दुर्घटना; फडणवीस यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.१३) दिली. (Mumbai Hoarding Collapse)

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना आतापर्यंत काय घडले?

  •  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतून ४७ नागरिकांना वाचविण्यात यश
  • जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू
  • दुर्घटनेबाबत उच्चस्तरीय चौकशी होणार

घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पुढे ते म्हणाले. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन या विभागाकडून समन्वय साधून दुर्घटनेमध्ये अडकलेल्यांना नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ४७ जणांना बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश आले आहे. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Mumbai Hoarding Collapse)

पहिल्याचं पावसात मुंबईत संकटांची अवकाळी : पहा व्हिडिओ

मुंबईत आज (दि.१३) वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे घाटकोपरमध्ये भलेमोठे होर्डिग थेट पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेमध्ये काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून यातील  ४७ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. दुर्घटनेतून नागरिकांना बाहेर काढून उपचारासाठी दाखल करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांसह पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

हेही वाचा :

 

Back to top button