पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयात बदल | पुढारी

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयात बदल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  इयत्ता तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांत धडे, कविता, घटक झाल्यानंतर दोन वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयात शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे. नव्या निर्णयात दुसरीच्या वर्गाचा समावेश करत नववी आणि दहावीच्या वर्गांना वगळले आहे. त्याचबरोबर हा निर्णय येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलात आणला जाणार होता, तो आता शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून लागू करण्यात येणार आहे.

गेल्या 2 मार्च रोजी याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. बुधवारी यात बदल करून पुन्हा नव्याने शासन निर्णय जारी केला आहे. यासंदर्भातील अंमलबजावणी एक वर्ष पुढे ढकलत नव्या निर्णयात दुसरीच्या वर्गाचा समावेश करत नववी आणि दहावीच्या वर्गांना वगळले आहे.

Back to top button