BEST Bus : अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बस आगीत जळून खाक | पुढारी

BEST Bus : अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बस आगीत जळून खाक

अंधेरी; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी (दि. २२) अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत बेस्ट बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बेस्ट बसला लागलेल्या या आगीमुळे अंधेरी पूर्व स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे.

अंधेरी पूर्व आगरकर चौकात असलेल्या टॅक्स इमारती जवळील ऑलविन झेरॉक्स समोर बस आली असता अचानक बसने पेट घेतला. काही क्षणातच संपूर्ण बस आगीमध्ये जळून खाक झाली आहे.

Back to top button