शिवसेना ही धगधगणारी अमरज्योत : संजय राऊत | पुढारी

शिवसेना ही धगधगणारी अमरज्योत : संजय राऊत

नवी मुंबई, पुढारी वृतसेवा : शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गद्दार, पळपुटे, ठेकेदार आणि दलाल निघून गेले आहेत. निखार्‍यावर जी राख साचली होती, ती उडाल्याने निष्ठेचा निखारा धगधगला आहे. शिवसेना अमर ज्योत आहे. तिच्यावर कोणी कितीही गुळण्या टाकण्याचा प्रयत्न केला तरी ती विझणार नाही. त्यामुळे गद्दारांना असे गाडा की ते पुन्हा तोंड वर करणार नाहीत, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी नवी मुंबईत केला.

खासदार राऊत म्हणाले की, शिवसेना दोन झाल्या आहेत, असे काहीजण बोलतात. मात्र शिवसेना ही शिवसेनाप्रमुखांचीच आहे आणि ती एकच आहे. दुसरा आहे तो गट आहे. त्याला जास्त किंमत द्यायची नाही.

शिवसेनाप्रमुखांनी माकडांची माणसे केली

शिवसेनाप्रमुखांनी माकडांना माणसे बनवली, माणसांना सरदार केले आणि त्याच सरदारांनी पाठीत खंजीर खुपसला, असाही समाचार खासदार राऊत यांनी यावेळी घेतला.

Back to top button