Mumbai : मविआ कडून राज्य सरकार विरोधात महामोर्चा; १७ तारखेला महाराष्ट्राच्या विराट शक्तीचं दर्शन | पुढारी

Mumbai : मविआ कडून राज्य सरकार विरोधात महामोर्चा; १७ तारखेला महाराष्ट्राच्या विराट शक्तीचं दर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सध्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करत सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत भाजप सरकार विरोधात जिजामाता उद्यान ते आझाद मैदान महामोर्चा काढणार आहोत, अशी माहिती उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी हा महामोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, येत्या 17 तारखेला अतिभव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा अपमान होत असल्याने आता महाराष्ट्राच्या शक्तीचं विराट दर्शन दाखवलं पाहिजे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये सर्वांनी सामिल व्हावं. हा केवळ राजकीय विषय नाही, तर राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, असं मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजप सरकारवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे. शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहे. सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहचवला जात आहे. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले आहेत. पुढच्या वर्षी कर्नाटकच्या निवडणुका असल्याने राज्यातील उद्योग आता कर्नाटकला जाणार का? या सगळ्यावरून राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडत आहे.”

इथले उद्योग बाहेर जाण्यापासून थांबवा; अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील यावेळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यपालांना हटवलं तरी हा मोर्चा होणारच. राज्यात नवीन सरकार आल्यापासून सीमाभागातील गावांकडून दुसऱ्या राज्यात जाण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे हा विषय केवळ राज्यपालांच्या वक्तव्याचा नाही. हे या आधी कधीही घडलेलं नव्हते. राज्यातील मोठमोठे उद्योग हे गुजरातला जात आहेत. हे या सरकारचं अपयश आहे. आम्ही नवीन उद्योग आणू असं म्हणणाऱ्यांनी जे उद्योग इथं आहेत ते पहिला थांबवा, असा टोला पवार यांनी लगावला.

हेही वाचा

Back to top button