नाशिक : निफाड शहरातील अवैध धंदे बंद करा; महिलांचे उपनगराध्यक्षांना साकडे | पुढारी

नाशिक : निफाड शहरातील अवैध धंदे बंद करा; महिलांचे उपनगराध्यक्षांना साकडे

निफाड : पुढारी वृत्तसेवा

निफाड शहर परिसरात विनापरवाना मद्यविक्री, गांजाविक्री, गुटखा व जुगार यांचे प्रमाण वाढत असून, याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत आहेत. शहरातील बरडवस्ती परिसरातील आदिवासी महिला आणि नागरिकांनी निफाड नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांची भेट घेत अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

शहरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना मद्यविक्री, गांजाविक्री, गुटखा व जुगार असे अवैध धंदे वाढत आहेत. अल्पवयीन मुले, तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. अशा प्रकारांमुळे शहरातील सामाजिक वातावरण दूषित होत असून, नागरिकांमध्ये असंतोष पसरत आहे. तसेच भविष्यात गुन्हे घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी तक्रार महिलांनी केली. तक्रारीची दखल घेऊन उपनगराध्यक्ष अनिल पाटील-कुंदे यांनी निफाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक रंगराव सानप यांच्याशी संपर्क साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरपंचायतीच्या कार्यालयात निमंत्रित केले. सानप यांनी महिलांच्या तक्रारी ऐकून घेत निफाड शहरातील व परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात आलेले असून, तरीही गैरप्रकार आढळल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

हेही वाचा:

Back to top button