Sushma Andhare Fb Post : प्रिय कब्बु…’बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत,’ सुषमा अंधारेंची लेकीसाठी भावूक पोस्ट | पुढारी

Sushma Andhare Fb Post : प्रिय कब्बु...'बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत,' सुषमा अंधारेंची लेकीसाठी भावूक पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश करून सुषमा यांच्याबद्दल गौफ्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर आपल्या लेक कब्बु हिला एक भावनिक पत्र लिहलं आहे. (Sushma Andhare Fb Post) हे पत्र त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटला शेअर केलं आहे.

त्यांचे हे पत्र फेसबुकवर मोठ्या प्रमाणात वाचले जात आहे. त्याच्यावर जवळपास 10 हजार लाइक्स, 1013 कमेंट्स पडल्या आहेत. तर तब्बल 300 वेळा शेअर केले आहे. (Sushma Andhare Fb Post) सुषमा अंधारे यांनी आपल्या लेकीला लिहलेल्या पत्रात शेवटी भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हंटलेल वाक्याचा एक उदाहरण दिलं आहे. त्यानंतर त्यांनी आई आणि लढा असा हॅशटॅग दिला आहे. असे काय लिहिले आहे सुषमा यांनी त्या पत्रात… वाचा त्यांच्याच शब्दात…

सुषमा अंधारे यांचे लेकीला पत्र… वाचा त्यांच्याच शब्दात

प्रिय कब्बु,

तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता पण अख्ख कुटुंब पाठीशी उभे राहिले. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलून मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले. (Sushma Andhare Fb Post)

बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचे नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत. बेहत्तर. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..! तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात.

बाबासाहेब लिहितात, ” जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..! भय, भ्रम, चरित्र हत्या हि मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा “

_ डॉ बाबासाहेब आंबेडकर

हेही वाचा

 

Back to top button