लालबागचा राजा गणेश मंडळाचा प्रसाद आता घरपोच | पुढारी

लालबागचा राजा गणेश मंडळाचा प्रसाद आता घरपोच

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला असताना सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी यंदा ऑनलाइन दर्शनावर गणेशमंडळाकडून भर दिला जात आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळने देखील ऑनलाईन दर्शनासोबत राजाचा प्रसाद घरपोच देण्यासाठी जिओ मार्टच्या घेतली आहे. त्यामुळे यंदा राजाच्या दर्शनासोबत प्रसाद घरबसल्या मिळणार असल्याने लालबागला जाण्याची गरज भक्तांना भासणार नाही.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे या वर्षी चे हे ८८ वे वर्ष आहे. शुक्रवार पासून पुढच्या 10 दिवसांच्या कालावधीत या वर्षीचा गणेशोत्सव कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासन, मुंबई महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने नेमुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.

या मध्ये प्रामुख्याने सर्व भाविकांचे दर्शन ॲानलाईन होणार आहे. लाखो-करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा प्रसाद मंडळ ॲानलाईन च्या माध्यमातून जिओ ॲपच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी पोहचवण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहे.

प्रसाद कसा मिळवाल?

मुंबई आणि पुण्यात जिओ मार्ट च्या माध्यमातून ऑर्डर घेणार आहे. क्युअ आर कोडच्या माध्यमातून आपल्या प्रसादाची ऑर्डर बुक करता येणार आहे.

या प्रसाद वितरणाची संपूर्ण माहिती मंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.lalbaugcharaja.com वर उपलब्ध आहे.

हेही वाचले का?

Back to top button